एलआयसीने पूर्ण केल्या दोन कोटीहून अधिक नवीन पॉलिसीज

September 13th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे  “गेल्या आर्थिक वर्षात (201617) भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) मार्केट शेअर अर्थात बाजारातील हिश्श्यात विमा पॉलिसीच्या निकषावर लक्षणीय वाढ झाली आहे.  या आर्थिक वर्षात एलआयसीने दोन कोटी एक लाखापेक्षा अधिक पॉलिसी पूर्ण केल्या असूनजवळपास सव्वा लाख कोटी रुपये प्रथम हप्ता उत्पन्न प्राप्त केले आहे,” अशी माहिती पुणे विभाग (1)चे वरिष्ठ मंडळ अधिकारी प्रसांत नायक यांनी दिली. दरम्यान, 62व्या वर्धापनदिनानिमित 1 ते 7 सप्टेंबर 2017 या कालावधीत एलआयसी सप्ताहाचे आयोजन केले आहेअसेही त्यांनी सांगितले.

एलआयसीच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत एलआयसीच्या कामगिरीचा आढावा घेताना प्रशांत नायक बोलत होते. यावेळी विपणन अधिकारी अब्राहम वर्गिस आणि डी. एम. सुखात्मे यांच्यासह एलआयसीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशांत नायक म्हणाले, “पॉलिसी संख्येवर आधारित एलआयसीचा बाजारातील हिस्सा 76.09 टक्केतर प्रथम हप्ता उत्पन्नावरील हिस्सा 71.07 टक्के आहे. सद्यस्थितीतील पॉलिसींची संख्या 29.04 कोटी इतकी आहे. 31 मार्च2017 अखेर एलआयसीचे एकूण उत्पन्न 4,92,626.60 कोटी असूनएकूण मालमत्ता 25,72,028 कोटी इतकी आहे. तर एलआयसीची गंगाजळी 23,23,502.59 कोटी आहे. एलआयसीने 215.58 लाख दाव्यांचे निराकरण केले असूनदाव्यांपोटी 1,12,700.41 कोटी रुपयांचे वितरण केले आहे. त्यामध्ये मुदतपूर्व दाव्यांचे प्रमाण 98.34 टक्केतर मृत्यू दाव्यांचे प्रमाण 99.63 टक्के आहे.”

10 वर्षानंतर प्रथम हप्ता उत्पन्नाचे उद्दिष्ट

पुणे विभाग 1 तर्फे जवळपास 10 वर्षानंतर प्रथम हप्ता उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यासह इतर सहा निकषांवरही उद्दिष्ट्यपूर्ती झाली आहे. 201617 या वर्षात 1,75,548 पॉलिसीमार्फत 38,808.53 लाख रुपयांचे एकूण हप्ता उत्पन्न झाले आहे. यामध्ये चिंचवड शाखेने (21,273)निगडी (18,969)पिंपरी (13,912) पॉलिसी केल्या आहेत. चिंचवडनिगडीपिंपरीयेरवडा व कॅम्प या शाखांनी विमा हप्ता उत्पन्नामध्येही विशेष कामगिरी केली आहे. प्रमोद पाटणकरश्रवण तलरेजागणपत चव्हाणज्ञानेश्वर डोकेगणेश भूजबळरमेश बीजापूरअनिल पिंटो व संजय गोर्‍हे या विकास अधिकार्‍यांनी उल्लेखनीय काम केले आहे. विमा प्रतिनिधींमध्ये कविता चनोदियावनिता ढमालेशिरीष गोवर्धनमहेश गुगळेरामचंद्र नायरस्वाती धूतगणेश देशमुखसुभाष पागळेसुनिलकुमार आग्रेचित्रा बेंद्रेएस. एम. जाधवकिरण भोलाणेराजेंद्र वाघ व शशिकांत पांडे यांनी चांगले काम केले आहे. क्लेम सेटलमेंटमध्येही पुणे विभाग 1 ने मोलाची कामगिरी बजावली आहे. देय विद्यमानता व मृत्यू दाव्यांचे निराकरण करताना 5242 मृत्यू दाव्यांपोटी 86.58 कोटी रुपये वारसांना दिलेतर मुदतपूर्ती दाव्यांपोटी767.97 कोटी रुपये देण्यात आलेअसे नायक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Visitor Count: 1539694
Designed and maintained by Leigia Solutions