रत्नागिरीतील ग्रामीण भागाचे सौभाग्य उजळले 

 • admin
 • January 19, 2018

रत्नागिरी (प्रतिनिधी )
 
‘सौभाग्य योजना’ अर्थात मागेल त्याला वीज जोडणी देण्यात येणार आहे. ही योजना जाहीर झाल्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात ३००  वीज जोडण्या देण्यात आल्या. पंडित दीनदयाळ यांच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौभाग्य’ ही योजना जाहीर केली आहे. देशातल्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकारने ‘सौभाग्य’ योजना जाहीर केली आहे. या योजनेंंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन देण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत ट्रान्स्फॉर्मर, मीटर आणि तारांसाठी सवलतही देण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी १३ हजार ७५० नवे मीटर प्राप्‍त झाली आहेत. यातील ७० टक्के मीटर नव्या जोडणीसाठी तर ३० टक्के मीटर जुने बदलून देण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. यातील ५ हजार ८०० मीटर…

READ more..

आगीत शेकडो एकरातील बागायती खाक 

 • admin

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) डिंगणे-धनगरवाडी येथे लागलेल्या आगीत सुमारे साडेतीनशे एकरातील बागायती जळून खाक झाली. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास लागलेली ही आग डिंगणे-धनगरवाडी येथून मोरगाव व डेगवे येथील बागायतीमध्येही शिरली. आग विझविण्यासाठी डिंगणे गाव एकवटला. त्यांच्या मदतीला शेजारील गावांतील ग्रामस्थही सरसावले. मात्र सकाळी साडेअकरा वाजता कळवूनही आपत्ती व्यवस्थापनकडून मात्र कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. अग्निशमन बंब दुपारी तीन वाजता दाखल झाला.
 डिंगणे-धनगरवाडी परिसारात डिंगणे, डेगवे, मोरगाववासीयांच्या काजू बागायती आहेत. अगदी गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर या काजू बागायती आहेत. नेहमीप्रमाणे येथील शेतकरी काजू बागायतीत काम करायला गेले होते. काही शेतकरी काम आटोपून घरी परतत असताना मोठय़ा प्रमाणात आग लागल्याचे त्यांना दिसून आले….

READ more..

‘पद्मदुर्ग’ एक अधुरे स्वप्न

 • admin
 • January 16, 2018

टिम “येवा कोकणात”

रायगड जिल्ह्यातील मुरुड मधल्या जंजिरा किल्यापासून काही अंतरावर समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ह्या पद्मदुर्ग म्हणजेच कासा किल्ल्याला विशेष महत्व आहे. किल्ला तसा छोटासाच पण सहा बुरूजांनी युक्त भक्कम तटबंदी किल्ल्यावर बर्याच ठिकाणी कमळाची चित्र कोरलेली दिसतात.या मुरुड गावाजवळ जंजिरा, सामराजगड आणि कासा उर्फ पद्मदुर्ग असे किल्ले आहेत.जंजिरा किल्याला पर्याय आणि सिद्धीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी हा किल्ला उभारला गेला मात्र इतिहासाची पाने चाळल्यावर हे स्वप्न अधुरेच राहिले म्हणायला हवे.
मुरुड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आहे.या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे.या ठिकाणाहून या किल्यात बोटीने जाता येते. दुर्गात प्रवेश करताच याची भव्यता कळून येते. कासा…

READ more..

चला करूया सेंद्रिय शेती

 • admin

शिवाजी खरात

 

शेतीच्या प्रारंभापासून मनुष्य हा शेतीशी निगडित आहे आणि तोही सेंद्रिय शेतीशी! त्यामुळे त्या काळी त्याचे उत्पन्न व उत्पन्नाचा दर्जा योग्य होता. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता व्यवस्थित होती; परंतु मध्यंतरीच्या काळात रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची प्रत खालावली व आता त्या नापीक होण्याच्या मार्गावर आहेत अथवा झाल्याच आहेत. त्यासाठी आपल्याला पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी लागणार्या घटकांची आपण पुढीलप्रमाणे माहिती घेऊया.
१. पाचटापासून गांडूळ खत.
२. निंबोळी अर्क
३. नाडेफ कंपोस्ट
४. बीजामृत
५. हिरवळीची खते
६. दशपर्णी अर्क
७. बायो-डायनॅमिक कंपोस्ट
पाचटापासून गांडूळ खत
पिकाचे…

READ more..

आकड्याचो खेळ

 • admin

बाळा कदम

 

संध्याकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे विश्वनाथ पराडकर, नाना पाटील, शानू बांगर, नानू मालवणकर वगरे मंडळी बांबरवाडीच्या फेमस ‘पिंकी हेअर ड्रेसर्स’ या सलूनमध्ये गजाली मारत बसले होते. तुकारामाची पंधरावडाभर वाढलेली खरखरीत दाढी जुने ब्लेड नव्या पाकिटातून काढून भिक्या खरडवित बसला होता.
कुठल्या तरी खूनप्रकरणावर इतरांची गरमागरम चर्चा रंगात आली होती आणि अशातच बाळया वाडेकर सलूनमध्ये आला. आल्या-आल्याच त्याने शरद्याला विचारलं,’शरद्या, कल्याण काय इला?’
‘हळू बोल. जिल्हयात नये एसपी इले हत. त्येंका कळला तर आकडयावाल्याक आकडी येतली.’ विश्वनाथाने बाळयाला सल्ला दिला. पण शरद्याला त्याचं काहीच नव्हतं.
‘तीनशे पस्तीस, दोनशे चाळीस.’ रोजच्या सवयीप्रमाणे शरद्याने पत्तीसह आकडा सांगितला. इकडे सोळा आकडा…

READ more..

समुद्री आपत्तीतील बचावाचे ठिकाण

 • admin

हेमंत कुलकर्णी

 

कोकण किनारपट्टीवरील नैसर्गिक सुरक्षित बंदर म्हणून देवगड बंदराचा उल्लेख केला जातो. या बंदराच्या चारही दिशांना डोंगर, पश्चिम दिशेला समुद्राचे विस्तीर्ण ५०० मीटरचे प्रवेशद्वार अशी देवगड बंदराची नैसर्गिक, भौगोलिक रचना आहे. कोकण किनारपट्टीवरील बहुतांशी बंदरे पश्चिमेकडे तोंड करून वसली आहेत. मात्र, एकमेव देवगडची जेटी पूर्वेकडे तोंड करून बांधली आहे. कितीही वेगाने वाहणारे वादळवारे असोत देवगड बंदरातील पाण्यावर साधा तरंगही उठत नाही. म्हणूनच वादळ वा-यात देवगड बंदर सुरक्षित समजले जाते. कोकण किनारपट्टीवरील सर्वात खोल बंदर विजयदुर्ग आहे. तर सर्वात सुरक्षित बंदर देवगड आहे. ही दोनही बंदरे देवगड तालुक्यात वसली आहेत. अलीकडेच आलेल्या ओखी वादळात याचा या बंदरात असलेली सुरक्षितता किती…

READ more..

दुहेरी पासपोर्ट धारकांच्या मतदान हक्कावर पुनर्विचार व्हावा,अभाविपच्या ५२व्या कोंकण प्रदेश अधिवेशनात मागणी

 • admin
 • January 6, 2018

रत्नागिरितील गोगटे जोगळेकर​ कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५२वे कोंकण प्रदेश अधिवेशन संपन्न झाले. अधिवेशनाचे उद्घाटन साहित्यिक तथा राष्ट्रीय सुरक्षा विषयक तज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. गोव्यातून ५० विद्यार्थी या अधिवेशनात सहभागी झाले होते.

तत्पूर्वी प्रा. मंदार भानुशे यांची अभाविप कोंकण प्रदेश अध्यक्ष तर अनिकेत ओव्हाळ यांची प्रदेश मंत्री म्हणून निवड करण्यात आली. गोगटे कॉलेज ते महालक्ष्मी चौक पर्यंत काढलेली भव्य शोभायात्रा अधिवेशनाचे खास आकर्षण ठरले. खुल्या अधिवेशनात विद्यार्थी नेत्यांनी शैक्षणिक,सामाजिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर आपली मते मांडली.

अधिवेशनात कोंकण आणि गोव्याला संबंधित असे काही प्रस्ताव पारित करण्यात आले.गोव्याचे ऋषिकेश शेटगांवकर यांनी मांडलेल्या एका प्रस्तावावर विचार विनिमय करताना…

READ more..
राजवट

अभेद्य जंजिरा आणि सिद्दी राजवट

 • admin
 • December 22, 2017

टिम “येवा कोकणात” 

कोकण प्रदेशात ऐतिहासिक वास्तू आजही इथला इतिहास लोकमानात जागृत ठेऊन आहेत, अशीच एक वास्तू म्हणजे जलदुर्गांमधील अभेद्य किल्ला रायगड जिल्ह्यातील जंजिरा. येथील समुद्रात उभा असलेला जंजिरा त्याकाळातील सागरी व्यापारी क्षेत्रातील मोठे स्थान मानले जाते.   रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला मुरुड तालुका वसलेला आहे.  मुरुडमधून चार पाच किलोमीटर अंतरावर राजपुरी हे गाव आहे. हे गाव खाडीच्या किनार्यावर आहे. येथून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे एकोणीस बुलंद बुरूज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या…

READ more..

कंडोम च्या जाहिरातीवरील वेळबंदी आणि नेहमीप्रमाणे दुटप्पी आपण

 • admin

नितीन साळुंखे

 

आपल्या देशात कधी काय चर्चेला येईल, त्याचा नेम नाही. आता कंडोम ही काय सार्वजनिक चर्चेची गोष्ट आहे? पण आमची त्यावरही चर्चा सुरू. चर्चा सुरू झाली, ती विविध वाहिन्यांवर प्राईम टाईमच्या दरम्यान दाखवल्या जाणाऱ्या कंडोम, सर्वसाधारण भाषेत निरोधच्या, जाहीरातींच्या वेळेवरून. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने कंडोमची जाहीरात दिवसा सकाळी सहा वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत दाखवण्यास बंदी आणली आहे. या जाहिरातींमुळे लहान मुलांवर विपरीत परिणाम होतात असं कारण देऊन या जाहिरातींवर वेळबंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय बरोबर आहे किंवा कसं, यावर जे मला वाटलं ते पुढे मांडणार आहे..! आपल्या देशात कधी काय चर्चेला येईल, त्याचा नेम नाही….

READ more..

अन्नपूर्णा नदी आणि मिठबाव

 • admin

टिम “येवा कोकणात”

 

देवगड तालुक्यातील सर्वात देखणा किनारा म्हणून मिठबांव तांबळडेगचा उल्लेख होतो. या सौंदर्याला चारचाँद लावले ते अन्नपूर्णा नदीने. शिरगावला उगम झालेली २१.७ कि. मी. धाव घेत या मिठबाच्या किना-यावर अन्नपूर्णा अरबीसुमद्राला विलीन होते. गोडे पाणी खारे होऊन जाते. परंतु, येताना ती अनेक गावांची तहान भागवत अनेक देवतांच्या परिसरात समृद्धी पसरवत पुढे रवाना होते. ही अन्नपूर्णाची गती समुद्र पाहताच शांत होते आणि ती हळूहळू वाळूतून सरकू लागते. मिठबांवला पर्यटन प्रकल्प मंजूर आहे. येथे पंचतारांकित हॉटेल करण्यासाठी ताज ग्रुपने जागा घेतली. मात्र, अद्याप हा परिसर विकसित करण्यात आलेला नाही. पर्यटनदृष्टय़ा मिठबाव, कातवण, कुणकेश्वर हा परिसर विकसित होत आहे. मिठबाव खाडीच्या…

READ more..
All rights reserved copyright ©2017
Visitor Count: 690435
Designed and maintained by Leigia Solutions