MAH: मुुलींच्या गटात हरियानाचे निर्विवाद वर्चस्व

March 14th, 2018 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे  :
 
२० वी सब-ज्युनियर गटाची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : महाराष्ट्राची दोन रौप्य, सात ब्राँझपदकांसह नऊ पदकांची कमाई  
 
स्वामी समर्थ ज्ञानपीठ संचलित सह्याद्री नॅशनल स्कूल आणि सह्याद्री कुस्ती संकुल तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २०व्या सब-ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मुलींच्या गटात हरियानाने निर्विवाद वर्चस्व राखले. तर, या गटात महाराष्ट्राला उपविजेतेपद मिळाले. 
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील कुस्ती हॉलमध्ये या स्पर्धेला सुरवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलींच्या दहा वजनी गटांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये हरियानाच्या मुलींनी दहा पैकी नऊ वजनी गटात सुवर्णपदक पटकावून आपले निर्विवाद वर्चस्व राखले. त्यांच्या मुलींनी चार रौप्य आणि दोन कांस्यपदकेही मिळवली. एक सुवर्णपदक दिल्लीच्या सिमरन हिने ४३ किलो वजनी गटात पटकावले. देहयष्टिने अन्य सहकाºयांपेक्षा काहिशा ताकदवान असणाºया हरियानाच्या मुली पदलालित्यातही अन्य स्पर्धकांना भारी पडल्या. त्यामुळे त्यांच्या लढती देखील एकतर्फी झाल्या. त्यांना प्रतिस्पर्धी झुंजच देऊ शकले नाहीत.
 
* महाराष्ट्राची कामगिरी सुधारली 
महाराष्ट्राने  या स्पर्धेत दोन रौप्यपदकांसह सात कांस्य अशी एकूण नऊपदके मिळवून आपली राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी सुधारली. गेल्यावर्षी महाराष्ट्राच्या  मुलींना तिसरे स्थान होते. यावेळी मुलींनी १५० गुणांसह दुसरे स्थान मिळविले.
यामध्ये सृष्टी भोसले (६१ किलो) आणि स्मिता पाटील (४९ किलो) यांच्या रुपेरी कामगिरीचा मोेठा वाटा राहिला. सुरवातीपासून सरस कुस्ती खेळणाºया दोघींना अंतिम फेरीत हरियानाच्या सहकाºयांचे आव्हान पेलता आले नाही. सृष्टी हरियानाच्या अनुभवी अंशु विरुद्ध १०-० अशी सहज हरली. कॅडेट गटातच जागतिक विजेती असलेल्या अंशुला प्रतिकार करण्यात सृष्टी अपयशी ठरली. स्मिता ही हरियानाच्या जिवीका कडून १०-० अशाच तांत्रिक गुणांवर हरली.
सृष्टी शिंगणापूर येथील सदाशिव मंडलिक कुस्ती संकुलात दादासाहेब लवटे यांच्याकडे मार्गदर्शन घेते. स्कूल नॅशनल्स आणि खेलो इंडियाचा अनुभव तिच्याकडे होता. मात्र, अंशुच्या अनुभवापुढे कमी पडले, हे तिने मान्य केले. यापुढे अधिक कठोर मेहनत करुन आंतरराष्टÑीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्याचा तिचा मनोदय आहे.
स्मिता पाटील कोल्हापूरात आमशी येथील कुस्ती केंद्रात संदीप पाटील यांच्याकडे मार्गदर्शन घेते. स्मिताने यापूर्वी स्कूल नॅशनलमध्ये पदक मिळविले आहे. कठोर मेहनत घेऊन झालेल्या चुकांवर अभ्यास करून खेळ उंचावण्याचा तिचा मनोदय असून तिने देखील आंतरराष्टÑीय स्तरावर खेळण्याचे स्वप्न बाळगले आहे.
 
* आळंदीच्या जोग व्यायामशाळेच्या मुली चमकल्या
महाराष्ट्राच्या  सात कांस्यपदकांपैकी भाग्यश्री फंड, राधिका चव्हाण, निकिता मोरे या तिघी आळंदीत जोग व्यायाम मंदिरात आंतरराष्ट्रीय  पंच दिनेश गुंड यांच्याकडे सराव करतात. यातील भाग्यश्री ही स्कूल नॅशनल आणि खेलो इंडिया या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. यावेळी मात्र हरियानाच्या मुुलींनी केलेल्या ताकदवान खेळापुढे ती निष्प्रभ ठरली.
 
स्पर्धेचे उद्घाटन भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी महासंघाचे सचिव विनोद तोमर, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आयोजक व भारतीय कुस्ती संघाचे उपाध्यक्ष (संलग्न) विजय बराटे, आंतरराष्ट्रीय  पंच दिनेश गुंड, रुस्तम ए हिंद अमोल बुचडे, अमोल बराटे आदी उपस्थित होते.
 
* अंतिम निकाल :- 
४० किलो : स्विटी (हरियाना), नीलम (हरियाना), रोशनी (दिल्ली), गोपव्वा (कर्नाटक), ४३ किलो : सिमरन (दिल्ली), हनीकु मारी (हरियाना), सपना कुमारी (हरियाना), निकीता (महाराष्ट्र), ४६ किलो : संजू देवी (हरियाना), रेणू मोर (दिल्ली), प्रियंका (उत्तर प्रदेश), पिंकी (हरियाना), ४९ किलो : जिवीका (हरियाना), स्मिता पाटील ( महाराष्ट्र ), राधिका ( महाराष्ट्र), उन्नती (दिल्ली),५३ कि लो : मिनाक्षी (हरियाना), पुष्पा यादव (उत्तर प्रदेश), पूजा जाट (मध्य प्रदेश), भाग्यश्री  ( महाराष्ट्), ५७ किलो : मानसी (हरियाना), प्रियंका (हरियाना), दिशा ( महाराष्ट्र), निशा तोमर (उत्तर प्रदेश), ६१ किलो : अंशु (हरियाना), सृष्टी  (महाराष्ट्र), पूजा गुर्जर (राजस्थान), लीना सिद्दी (कर्नाटक), ६५ किलो : सोनम (हरियाना), भतेरी (हरियाना), विश्रांती (महाराष्ट्र), खुशी दहिया (दिल्ली), ६९ किलो : रविता कुमारी (हरियाना), अंशु गुजर (उत्तर प्रदेश), ऋतुजा ( महाराष्ट्र ), अर्शप्रीत कौर (पंजाब), ७३ किलो : पूजा (हरियाना), सोनाफार पठाण (गुजरात), वैष्णवी ( महाराष्ट्र), वर्षा चौधरी (उत्तर प्रदेश).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Visitor Count: 2212006
Designed and maintained by Leigia Solutions