MAH: सिद्धगिरीमठ येथे सेंद्रियशेती कार्यशाळेचे आयोजन तज्ञांचे लाभणार मार्गदर्शन 

March 15th, 2018 Posted In: येवा कोकणात

Team TNV

 
कोल्हापूर
 
श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी, कोल्हापूर येथे २१ ते २३ मार्च  २०१८ रोजी सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी विविध स्तरावरील मान्यवरांच्या  उपस्थिती लाभणार आहे. दिनांक २१ मार्च रोजी सकाळी १० ते ११ वाजता सेंद्रिय शेती कार्यशाळेंचे उदघाटन पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या पावन उपस्थितीत  उमेशजी पाटील सिंग (अधिक्षक कृषी अधिकारी विभागिय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग ) यांच्या हस्ते संपन्न होईल. या सोहळ्यासाठी मा. डॉ.एल नारायण रेड्डी यांचे  ‘नत्र स्फुरद पालाश पीकसंजीवके किटकनाशके’ या विषयावर मार्गदर्शन व व्याख्यान दुपारी ११:०० ते २:०० या वेळेत होणार आहे. अशोकराव इंगपलेसी यांचे दुपारी २:३० ते ४:०० या वेळेत ‘आदर्श गोपालन’ याविषयावर मार्गदर्शन होईल. अमोल कोळीसे  (सांगली) यांचे ‘उन्हाळ्यासाठी चारा निर्मिती’ या विषयांवर मार्गदर्शन होईल.  मोहनदादा मोहीते( मांसर्डे) यांचे ‘सेंद्रिय मिश्र फळबाग जोपासणा’ या विषयांवर मार्गदर्शन तसेच अरुण पाटील (खेबवडे) मार्गदर्शन करून प्रथम दिवसाचा  समारोप करतील. 
शेतकरी स्वयंपूर्ण झाला पाहिजे त्याकरिता उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे,३०० रुपयात एकरी NPK कसा तयार करायचा,बाजारात ४००० रुपये लिटर मिळणारे पेस्टीसाइड, घरच्या घरी फक्त ८० रुपयात बनविण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिनांक २२ मार्च रोजी या शिबिरात पाहायला मिळणार आहेत. या कार्यशाळेत सेंद्रिय उत्पादन, उत्पादन मालावर प्रक्रिया, मार्केर्टिंग, नत्र स्पुरद आणि पालाश खते, सेंद्रीय किटक नाशके टॉनिक हे घरी आणि तेही १०% किमतीत कसे बनवायचे यासाठी प्रात्यक्षिका सहित मार्गदर्शन मिळणार आहे.  सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे पोलंडच्या संसदेने सेंद्रीय शेतीवर प्रबोधन करण्यास ज्या एकमेव भारतीय तज्ञांस निमंत्रित केले ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.एल.नारायण रेड्डी (सेंद्रीय शेतीचे चालते-बोलते विद्यापीठ) कार्यशाळेत शिबिरार्थींना संबोधित करणार आहेत. कार्यशाळेच्या निमित्ताने सेंद्रिय पध्दतीतून एनपीके खताची निर्मिती, सेंद्रिय वाढ संप्रेरके तसेच कीडनाशकांची निर्मिती याची माहिती दिली जाईल. शास्त्रज्ञ डॉ.एल.नारायण रेड्डी यावेळी प्रात्यक्षिकांसहीत माहिती देणार आहेत. देशी गोवंशांचे प्रकार, गायीच्या दुग्ध पदार्थांचे महत्व याविषयांवर देखील सखोल मार्गदर्शन शेतक-यांना केले जाते. कार्यशाळेत डॉ.एल.नारायण रेड्डी व अन्य शेती तज्ञ शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय एक एकरमध्ये १०० पिके घेण्याचा अनोखा प्रयोग व भारतीय गोवंश संपूर्ण २३ प्रजातीची सुमारे ८०० गायींची भव्य गोशाळा तसेच सायंकाळी ५:३० ते ६:०० वेळेत प्रश्नोत्तर आणि  ७:२० ते ८:२० या वेळेत शेतकऱ्यांचे अनुभव कथन होईल. 
दिनांक २३ मार्च रोजी महाराष्ट्र क्रषि भूषण  दिलीप कूलकर्णी ऊदगीर ह्यांचे दूध विरहीत फायदेशीर गौवंश व्यवस्थापन ,डॉ. नितिन मार्कंडेय सर, डॉ. एस आर राजुरकर व डॉ. आनंद देशपांडे सर  आयुर्वेदीक गोउपचार पद्धतीवर*  मार्गदर्शन करतील.  कार्यशाळेत सहभागी होणा-या शेतक-यांसाठी निवास आणि भोजनाची मोफत सोय करण्यात आली आहे. नाव नोंदणीसाठी अशोकराव चौगुले  ९४२११०९७५३, प्रसाद चौगुले  ९६८६०६०००३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Visitor Count: 2977829
Designed and maintained by Leigia Solutions