MAH: स्वच्छ भारत अभियानात ‘पुणे डस्क फोटोगृ‌‌फी’ चा सक्रिय सहभाग

-->

April 8th, 2018 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियानात पुण्यातील युवकांनी आज विशेष सहभाग नोंदवत एक अनोखा उपक्रम राबविला. ‘पुणे डस्क’ आणि महाराष्ट्र आयजी(Maharashtra_ig) व एवणं रेचारसिस (Ewan Researchers) च्या माध्यमातून हे काम केले गेले असून यामध्ये ‘फोटो वॉक आणि स्वच्छता’ असे या अभियानाचे स्वरूप होते.
‘पुणे डस्क’ च्या वतीने हे अभियान आज दि.7 एप्रिल रोजी पुण्यातील लाकडी पुल ते भिडे पुल दरम्यान राबविण्यात आले. या रस्त्यावरील घाणीचे फोटो काढून ती जागा नंतर साफ करण्यात आली. या कार्यक्रमात विश्रामबाग पोलिस वाहतूक शाखेचे पो.उप नि.सुरज पाटील सहभागी झाले होते. या स्वच्छता अभियानात जवळ पास १०० सुजाण पुणेकरांनी सहभाग नोंदविला व या परिसराचा कायापालट केला. ‘पुणे डस्क’ च्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Visitor Count: 3475386
Designed and maintained by Leigia Solutions